डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात रविवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता भव्य मल्हारगड दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित होणारा हा मेळावा यंदाही राज्यभरातील ओबीसी, बहुजन, भटके-विमुक्त समाज घटकांना एकत्र आणणारा ऐक्याचा संदेश देणारा ठरेल, अशी माहिती मेळाव्याचे संस्थापक नवनाथ पडळकर यांनी दिली.
या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, अॅड. मंगेश ससाणे यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या काळात महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणे, आरक्षणाचे गंभीर प्रश्न, तसेच वाढती नैसर्गिक संकटे या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाच्या ऐक्याची नितांत गरज आहे.
खंडेरायाच्या दरबारातून अठरापगड जातींच्या ऐक्याचा संदेश देण्याचे हे व्यासपीठ ठरणार आहे, असे पडळकर यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments