Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र मोरगाव येथे 108 रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मोरगाव येथे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, नव्याने उपलब्ध झालेल्या 108 रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री क्षेत्र मोरगाव येथे संपन्न झाला.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद पुणे सदस्या रोहिणीताई संदीप कदम (ढोले) यांच्या विशेष प्रयत्नांतून ही 108 रुग्णवाहिका सेवा मोरगाव परिसरासाठी उपलब्ध झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी (नाना) होळकर हे प्रमुख उपस्थित होते. 



यावेळी कार्यक्रमास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किसन तांबे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब गुलदगड, बाळासाहेब जगदाळे, बारामती दूध संघाच्या संचालिका अमृता गारडे, पांडुरंग गारडे, लालासाहेब नलावडे, पोपट तावरे, निलेश केदारी, सुनील राजे भोसले, अविनाश ढोले परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी ही रुग्णवाहिका लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे मोरगाव व परिसरातील ग्रामस्थांमध्ये या लोकार्पण सोहळ्याबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान बनविणाऱ्या या उपक्रमामुळे मोरगाव परिसरातील हजारो नागरिकांना भविष्यात तातडीच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments