Type Here to Get Search Results !

सुपेतील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फळे-बिस्किटांचे वाटप

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
सुपे येथील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे प्रतापसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फळे, बिस्किट व फिनेल याचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणीताई कदम-ढोले तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे सुपे परगना प्रमुख सुनील राजे भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक बांधिलकी जपत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या या निवासी विद्यालयाच्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
दरम्यान, या शाळेच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासन दरबारी अनेक मागण्या प्रलंबित असून, त्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विविध अडचणी व मर्यादा असतानाही संस्थाचालक, शिक्षक व कर्मचारी शाळा उत्तम पद्धतीने चालवत असून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कार आणि आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल मान्यवरांनी संस्थेचे संस्थापक व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.



यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणीताई कदम-ढोले, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे सुपे परगना प्रमुख सुनील राजे भोसले, सुयश जाधव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयराम सुपेकर, व्यवस्थापक गणेश भुजबळ, मुख्याध्यापिका शुभांगी सुपेकर, विशेष शिक्षिका प्राजक्ता बसाळे, क्रीडाशिक्षक प्रवीण दुर्गे, अधीक्षक अविष्कार कोंडे, मारुती पवार, राहुल हणमंते (मामा) यांच्यासह मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने प्रलंबित मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments