Type Here to Get Search Results !

तरडोलीच्या श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी किसन धायगुडे तर व्हा. चेअरमनपदी रमेश गाडे यांची बिनविरोध निवड

 



बारामती : प्रतिनिधी
तरडोली येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तरडोली च्या चेअरमनपदी किसन हरिबा धायगुडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश कांतीलाल गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. गुरूवारी (दि. ९) रोजी दुपारी १२ वाजता नवीन पदाधिकारी निवडीसाठी सहकार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चेअरमनपदी किसन हरिबा धायगुडे यांची तर व्हा. चेअरमनपदी रमेश कांतीलाल गाडे यांची बिनविरोध झाल्याचे दुरगुडे यांनी जाहीर केले.



   यावेळी संचालक फुलचंद पवार, अशोक पवार, नवनाथ जाधव, शारदा भापकर, बेबी तांबोळी, विनायक गाडे, सचिव मोहन पवार रविंद्र साळवे, माजी सरपंच रामचंद्र भोसले, माजी चेअरमन वसंत भापकर, तानाजी धायगुडे, संजय पाटील, भगवान धायगुडे, नवनाथ ठोंबरे, राजवर्धन भापकर, साहेबराव धायगुडे व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments