Type Here to Get Search Results !

मुर्टीच्या प्रशांत क्लीनिक आणि एकदंत मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकच्या वतीने सुवर्णकन्या अभियान व महिलांचा सन्मान

 



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी  

 बारामती तालुक्यातील मुर्टी याठिकाणी प्रशांत क्लीनिक आणि एकदंत मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक यांच्या वतीने सुवर्णकन्या अभियान, महिलांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन हा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मिताताई मोरे, प्रमुख वक्त्या स्वाती दाभाडे तर प्रमुख पाहुण्या विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग (सातारा) रेश्मा सुधीर मोरे-होरकाटे या होत्या.

     सुवर्णकन्या उपक्रमांतर्गत परिसरातील 16 गावांमध्ये ज्या दाम्पत्यांनी एक आणि दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे, त्यांच्या नावे अनुक्रमे 15 व 10 हजार रुपयांची ठेव ठेवण्यात आली. तसेच त्यांना सन्मानपत्र देण्यात आले.

    यामध्ये काजल तुषार भोसले एक मुलगी (जोगवडी), प्राजक्ता प्रवीण गुलदगड एक मुलगी (पळशी), धनश्री अभिनंदन बारवकर (मोराळवाडी) दोन मुली, सारिका राजेंद्र जगदाळे दोन मुली (मुर्टी), व गायत्री हनुमंत तांबे दोन मुली (मुर्टी) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



चौकट : प्रशांत क्लिनिक मुर्टी यांच्यामार्फत व परिसरातील सहयोगी 20 तज्ञ डॉक्टरांमार्फत या मुलींना आजन्म मोफत उपचार देण्यात येणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांकडून आतापर्यंत 60 मुली दत्तक घेण्यात आल्या आहेत. 

सुवर्णकन्या अभियानातील सहभागी डॉक्टर-डॉ. संजय सावंत, डॉ. संजय शिवदे, डॉ. गणेश बोके, डॉ. रामदास कुटे, डॉ. विशाल मेहता, डॉ. राहुल जाधव, डॉ. गणेश म्हस्के, डॉ. सागर महानवर, डॉ. रोहन रावखंडे, डॉ. प्रशांत माने, डॉ. अपर्णा पवार, डॉ. मनोज निकम, डॉ. प्रसाद भट्टड, डॉ. तुषार शिंदे, डॉ. संजीव पवार व डॉ. पल्लवी पवार.

  या कार्यक्रमांमध्ये मुर्टी व परिसरामधील नावलौकिक मिळवणाऱ्या जोगवडीच्या रूपाली खोमणे,नावळीच्या राजश्री चौरे, मोढवेच्या प्रतीक्षा मोरे, सानिया कारंडे तसेच छाया जगदाळे या महिलांचाही सन्मान करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. संजय सावंत, नीता सावंत, डॉ. संकेत सावंत, डॉ. कीर्ती सावंत, डॉ. श्वेता सावंत बोऱ्हाडे, डॉ. राजेंद्र पाटील व प्रशांत क्लिनिकच्यावतीने करण्यात आले होते.

    यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब नलावडे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासो जगदाळे, सातारा एपीआय सुधीर मोरे, मुर्टीच्या सरपंच कोमल जगताप, मोढव्याच्या सरपंच शितल मोरे, मोराळवाडीच्या सरपंच सारिका गोफणे, पळशीच्या ताई काळे, नानासाहेब जगदाळे, किरण जगदाळे, शरद साळुंखे, निलेश शेलार, बालगुडे आप्पा, पोलीस पाटील तृप्ती गदादे उपस्थित होते.

 फोटोओळी : मुर्टीत एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दांपत्यांचा सत्कार करताना मान्यवर.

Post a Comment

0 Comments