डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
कै. महादेव धोंडिबा बरकडे (वय-८०) रा. पिसुर्टी (ता. पुरंदर) यांचे रविवारी १२ ऑक्टोबर रोजी पिसुर्टी याठिकाणी आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा खूप मोठा परिवार आहे.
महादेव बरकडे म्हणजे नीरा पंचक्रोशित एक नामांकित नाव, जुन्या काळात लोक जात्यावर दळत होते तेव्हा त्यांनी प्रथम त्यांच्या पिसुर्टी गावात पिठाची गिरण आणली आणि नाममात्र शुल्कात लोकांना दळण दळून दिले तसेच पुर्वी घरात प्रकाशासाठी दिवा लावला जायचा तेव्हा त्यांनी पहिली लाईट त्यांच्या घरी आणली. पुर्वी लोकांना सायकल मिळत नसे परंतु महादेव बरकडे यांनी त्यांच्या गावी प्रथम राजदूत टु व्हिलर गाडी आणली होती आणि गावात, परिसरात एखादी दुःखद घटना घडली तर त्या काळी टेलीफोन (मोबाईल) नसल्यामुळे त्या गाडीचा गावक-यांना व परिसरातील ग्रामस्थांना त्याचा उपयोग व्हायचा. तसेच त्यांनी जुन्या काळी माडी बांधल्यामुळे माडीवाला महादेव या नावाने ते परिचित होते. वाघर मराठी चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक व पुणे जिल्हा कॉग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांचे ते वडील होत.
त्यांच्या या दुःखद निधनाबद्दल नीरा, पिसुर्टी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments