डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) बारामती
शाखेच्या वतीने मुर्टी ग्रामपंचायतीस आदर्श विमा ग्राम पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय सावंत हे होते.ग्रामपंचायत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
एलआयसीचे शाखा अधिकारी अजय कांबळे, उपशाखा अधिकारी दिलीप वेताळ, विमा प्रतिनिधी सुरेश गदादे, उदयकुमार गाढवे, लालासाहेब नलवडे यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश सरपंच कोमल जगताप, उपसरपंच किरण जगदाळे, ग्रामसेविका रोहिणी पवार यांनी स्वीकारला.
यावेळी कांबळे यांनी एलआयसीच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. आदर्श विमा ग्राम पुरस्काराच्या रक्कमेचा उपयोग सामाजिक उपक्रमासाठी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब जगदाळे, प्रियांका गदादे, माधुरी चव्हाण, अश्विनी बालगुडे, पोलीस पाटील तृप्ती गदादे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश गदादे, सूत्रसंचालन निलेश जगताप यांनी तर आभार सतीश जगदाळे यांनी मानले.


Post a Comment
0 Comments