Type Here to Get Search Results !

जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ घेण्याचे पणदरेचे प्रभारी मंडलाधिकारी नलवडे यांचे आवाहन

 



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
तहसील कार्यालयामार्फत २६ डिसेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या काळात 'जिवंत सातबारा मोहीम टप्पा-२'चे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पणदरेचे प्रभारी मंडल अधिकारी एस. आर. नलवडे यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत ७/१२ अद्ययावत करणे, यामध्ये ए.कु.मॅ. कमी करणे, अ.पा.क., इतर हक्कातील महिला वारस नोंदी कब्जेदार सदरी दाखल करणे, सातबाऱ्यावरील इतर अनावश्यक कालबाह्य नोंदी कमी करणे, रहिवासी विभागातील तुकडेबंदीचे व्यवहार विनामूल्य नियमित करणे, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करणे ही सर्व कामे विनामूल्य केली जाणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारच्या शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही.
नागरिकांनी अर्जासोबत संबंधित सातबारा आणि फेरफार संलग्न केल्यास नोंदी जोडव्यात, यासाठी संबंधित महसूल मंडळातील मंडल अधिकारी व गावचे संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज व संबंधित कागदपत्रे जमा केल्यास २६ जानेवारीपूर्वी नोंदी नियमितीकरण केले जाणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मोहीम स्वरूपात देण्याचे नियोजन केले आहे.
यावेळी पणदरे मंडळातील पणदरेचे ग्राम महसूल अधिकारी गोरक्षनाथ इंगळे, पवईमाळचे आदेश निकम, मानाप्पावस्तीचे ग्राम महसूल अधिकारी हेमंत रेड्डी, धुमाळवाडीचे शिवप्रसाद जाधव, ढाकाळेचे भगवंत पारेकर, सांगवीचे सोमनाथ थोरात आदी उपस्थित होते.
फोटोओळी : पणदरे याठिकाणी उपस्थित मंडल अधिकारी व गावचे संबंधित ग्राम महसूल अधिकारी.

Post a Comment

0 Comments