डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
चौधरवाडी (ता.बारामती) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर आठवडे बाजार भरवला होता. बाजाराचे उद्घाटन चौधरवाडीचे सरपंच शशांक पवार, उपसरपंच राहुल चौधरी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. पालकांनी व ग्रामस्थांनी बाजारात खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले. बाजारामध्ये मुलांनी विविध वस्तूंची दुकाने मांडली होती.
मुलांना आर्थिक व्यवहार समजावेत, शिक्षण आणि व्यवहार यांची सांगड घालावी, कोणतेही काम कमी दर्जाचे नसते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आठवडे बाजार भरवला होता. यामध्ये मुलांनी विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळभाज्या, पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती. आठवडे बाजार खरेदीसाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे, पोलीस पाटील राजकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उपाध्यक्ष चारुहंस शिंदे, गोरख चौधरी, तानाजी भापकर, निखिल चौधरी, कैलास पवार, रमेश चौधरी, केंद्र प्रमुख शब्बीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यअध्यक्षा सुचिता साळवे, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments