Type Here to Get Search Results !

सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेची यशस्वी वाटचाल; ‘पुरंदर रिपोर्टर’ व ‘बारामती रिपोर्टर’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात


 

डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

सत्य, अचूक आणि वेगवान पत्रकारितेच्या जोरावर अल्पावधीतच जनमानसात विश्वासार्ह ओळख निर्माण करणाऱ्या ‘पुरंदर रिपोर्टर’ व ‘बारामती रिपोर्टर’ या न्यूज चॅनलचा प्रथम वर्धापन दिन सोहळा निरा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकारितेसोबत सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित घटकांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप उपस्थित होते. मुंबई मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष श्यामकाका काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना संजय जगताप म्हणाले, “पत्रकारितेतील नवा ‘रिपोर्टर’ म्हणून पुरंदर रिपोर्टरने अल्पावधीतच जनमानसात विश्वास निर्माण केला आहे. सामाजिक जबाबदारी जपत केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असून समाजासाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्राचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पत्रकारितेचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.



वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले. परिसरातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच सोमेश्वर येथील दिव्यांग बांधव रविराज गिरी यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सामाजिक उपक्रमांचे उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केले.

समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. ‘पुरंदर रिपोर्टर आरोग्यमित्र २०२६’ हा पुरस्कार लोणंद येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नितीन सावंत यांना प्रदान करण्यात आला. तसेच डिजिटल माध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मराठी कॉर्नर’ युट्यूब चॅनलचे संपादक शुभम पवार यांचा ‘उगवता तारा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत निःपक्ष, लोकाभिमुख आणि जनहिताच्या पत्रकारितेच्या माध्यमातून ‘पुरंदर रिपोर्टर’ व ‘बारामती रिपोर्टर’ यांनी नागरिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. वर्धापन दिन सोहळ्याला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच त्यांच्या कार्याची मोठी पावती असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोद काकडे, दत्ताआबा चव्हाण, सोमेश्वरचे माजी चेअरमन शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे व प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, बाबा चोरमले, सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष अभीकाका देवकाते, युवा नेते सनी देवकाते, दिलीप फरांदे, डॉ. वसंत दगडे, किशोर शेळके यांच्यासह पुरंदर, बारामती, खंडाळा व इंदापूर तालुक्यातील पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘पुरंदर रिपोर्टर’चे संपादक विजय लकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पहिल्याच वर्षात यशाची उंच भरारी घेतलेल्या ‘पुरंदर रिपोर्टर’ने सामाजिक बांधिलकी, सकारात्मक पत्रकारिता आणि जनहिताचा ध्यास कायम ठेवत नव्या वाटचालीची दिशा निश्चित केली असल्याचे मत यावेळी व्यक्त कर

ण्यात आले.

Post a Comment

0 Comments