Type Here to Get Search Results !

बारामती विधानसभा अध्यक्षपदी दयानंद पिसाळ यांची फेरनिवड; तळागाळातील कार्याची पक्षश्रेष्ठींकडून दखल

 



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभा अध्यक्षपदी दयानंद पिसाळ यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय संघटनात्मक कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दयानंद पिसाळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन समाज पार्टीची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच वंचित घटकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी प्रभावीपणे आवाज उठविला आहे. त्यांच्या जनसंपर्काची व्याप्ती आणि संघटन बांधणीतील कौशल्यामुळे बारामती विधानसभा क्षेत्रात पक्षाची ताकद वाढण्यास मोठी मदत झाली असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी दयानंद पिसाळ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. जनतेशी असलेली नाळ, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धती यामुळेच त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बारामती विधानसभा कार्यकारिणीची देखील घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रभारीपदी संदीप खांडेकर, उपाध्यक्षपदी विशाल घोरपडे, महासचिवपदी इसाक पठाण, सचिवपदी प्रवीण शिंदे, कोषाध्यक्षपदी रोहित जगताप तसेच बीव्हीएफ संयोजकपदी विकी बनसोडे यांची निवड करण्यात आली.
दयानंद पिसाळ हे सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी दृढ संबंध निर्माण केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात बहुजन समाज पार्टी बारामती विधानसभा क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या निवड प्रक्रियेच्या वेळी प्रदेश महासचिव काळुराम चौधरी, शहराध्यक्ष भास्कर दामोदरे, उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, दौंड विधानसभा माजी अध्यक्ष विशाल सोनवणे, रोहित लोंढे, आनंद लष्कर, सचिन जाधव, समर वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments