Type Here to Get Search Results !

मोराळवाडीत पंचायत समिती सदस्य बाबासाहेब चोरमले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोराळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शनिवार (दि. 20 जून) रोजी बारामती पंचायत समितीचे सदस्य बाबासाहेब चोरमले यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब चोरमले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच चांगले संस्कार जोपासावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व, जलसंधारणाची गरज तसेच शेततळ्यांमुळे शेतीला होणारे फायदे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा योग्य वापर व साठवण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.



कार्यक्रमात दत्तात्रय पडळकर यांनी मोराळवाडी शाळेची मॉडर्न स्कूलसाठी निवड झाल्याची माहिती दिली. शाळेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाबासाहेब चोरमले यांनी आपल्या स्तरावरून विशेष लक्ष द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कमलेश माघाडे तसेच अन्य मान्यवरांनी बाबासाहेब चोरमले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पडळकर, भाजपचे नेते रामदास नवले, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ माघाडे, विश्वास नवले, विठ्ठल बरकडे, अंकुश मासाळ, रमेश येळे, महेंद्र नवले, उत्तम बंडगर, दादा करे, भाजपचे शाखाध्यक्ष सचिन कारंडे, मुकुंदा कारंडे, भाऊसाहेब बंडगर, अतुल माघाडे, संदीप माघाडे, महेश बरकडे, नानासो बंडगर, संदीप बंडगर, शहाजी बंडगर, अमोल येळे, सोमनाथ बरकडे, ऋषिकेश माघाडे, वैभव मासाळ, भाऊसाहेब केसकर, मुख्याध्यापक शहाजी नाईक, शिक्षिका सविता जगदाळे, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments