डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची संधी आहे, या भावनेतून नेहा अविनाश बनसोडे यांनी समाजसेवेचा अनोखा आदर्श घालून दिला. वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीभापकर येथील विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमात बारामती पंचायत समिती सदस्य बाबा चोरमले, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, माजी मुख्याध्यापक संजय भापकर आणि मुख्याध्यापक संदीप जगताप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. नियमित शाळेत उपस्थित राहून मन लावून शिक्षण घ्यावे आणि उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमास सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव विजयसिंह भापकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार मदने, पळशीचे उपसरपंच विठ्ठल इजगुडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अमोल मदने, पत्रकार काशीनाथ पिंगळे, शरद भगत, दत्तात्रय बनसोडे, किरण मोरे, चेतन मोरे, शंकर कडाळे, सुहानी मोरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दलित पँथरचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश बनसोडे म्हणाले, “वाढदिवस केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा दिवस असावा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात संवेदनशीलता आणि सेवाभाव वाढीस लागतो.”
या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक करत समाजातील इतरांनीही वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर आनंदाचे क्षण सामाजिक उपक्रमांद्वारे साजरे करण्याचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.



Post a Comment
0 Comments