प्रतिनिधी : अविनाश बनसोडे
लोणी भापकर (ता.बारामती) येथील राजे प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी झालेल्या किल्ले बनवा स्पर्धेत सहर्ष सचिन भापकर याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुष्का गणेश वाघ, तृतीय क्रमांक अर्थव राहुल जगताप, चतुर्थ क्रमांक श्रावणी बापू भापकर, पाचवा क्रमांक नक्ष तानाजी कांबळे, सहावा क्रमांक अनय अमोल बारवकर तर उत्तेजनार्थ बक्षीस शंभू मधुकर मदने, आयुष मनोज साठे, रजिन मतीन तांबोळी यांनी अनुक्रमे बक्षिसे मिळवली.
या स्पर्धेत एकुण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना दुर्गसंवर्धनाची प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल जागृती व्हावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.
विद्यार्थ्यांनी साकारलेला किल्ला पाहताना विद्यार्थ्यांनी कुलाबा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, जंजिरा, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविल्या होत्या. स्पर्धेचे परीक्षण माजी मुख्याध्यापक संजय भापकर व ओंकार गोलांडे यांनी केले.



Post a Comment
0 Comments