डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर याठिकाणी पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आरोग्य विभाग पंचायत समिती बारामती व लोणी भापकर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमिया मुक्त गाव अभियान राबवण्यासाठी आरोग्य शिबीर व नेत्र शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किशोर माने, लोणी भापकरच्या लोकनियुक्त सरपंच गीतांजली भापकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते शौचालय युनिट, प्रधानमंत्री घरकुल, रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के निधीचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी यांनी मंदिरात जाऊन भैरवनाथांचे दर्शन घेतले तसेच सभामंडपाचीही पहाणी केली.
यावेळी माने यांनी ग्रामपंचायतने केलेली विविध विकासकामे, त्यामध्ये घेतलेला सहभाग याबद्दल गटविकास अधिकारी माने यांनी ग्रामपंचायतचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर यांनी केले. तसेच ग्रामपंचायतीने केलेले विविध उपक्रम, कार्यक्रम याची माहिती यावेळी भापकर यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भापकर, नंदकुमार मदने, सदस्या कविता आरडे, स्वाती बनसोडे, तेजस गायकवाड, ऋषीकेश भापकर, वैभव बारवकर, भीमराव पवार, दत्तात्रय भापकर, डॉ. जीवन सरतापे, भानुदास भोसले, लक्ष्मण कडाळे, अविनाश बनसोडे, दादा कडाळे, ग्रामसेविका उज्वला शिंगाडे, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments