Type Here to Get Search Results !

पांढरवस्ती शाळेत माजी विद्यार्थ्यांचा २५ वर्षानंतर रमला स्नेहमेळावा

 


 डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

पांढरवस्ती (ता. बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९९-२००० च्या बॅचच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. त्यांनी २५ वर्षांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. एस. फरांदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंत गाडेकर होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्यात आला. सचिन बजरंग जगताप, सचिन शंकर जगताप, सचिन गायकवाड, वैशाली करे, सुषमा गाडेकर, मनीषा जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सहा वर्ग खोल्यांना रंगकाम करण्याचा खर्च दिला तसेच साऊंडसेट भेट दिला.



 गेल्या २५ वर्षानंतर विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा होत असल्याने पुन्हा जुने मित्र नव्या रंगात, नव्या ढंगात दिसले. कोणी उद्योजक झाला, कोणी मॅनेजर झाला, शेतकरी व दुग्ध व्यवसाय करणारा झाला पण ते सर्व आपापले व्यवसाय व डिग्र्या घरी ठेवून आपले जुने सवंगडी, वर्गमित्र, वर्गमैत्रिणी म्हणून एकत्र भेटले व एक शाळेचे आपुलकीचे नातेसंबंध म्हणून सर्वांनी शाळेत पुन्हा एकदा एकत्र वर्ग भरवला व जुन्या आठवणींना उजाळा दिला.



  या वेळी संचालक शिवराम गाडेकर, माजी मुख्याध्यापक भंडलकर आर.एन., आर.एम. कुतवळ, एस. जी. शेंडकर, सी. आर. मुळीक, पी.बी. जगताप, के. जी. जगताप, व्ही.सी. ननवरे, जी. जी. धायगुडे, जे. ए. भगत, ए. डी. भापकर, डी. पी.जगदाळे, वाय.डी. तांबोळी, आशालता भापकर, आर. एम. साळुंखे, बी. एस. भोसले, व्ही.डी. जगताप, डी.बी. भोसले, एस.बी. मदने, एस.बी. कोकरे उपस्थित होते.

  या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर जगताप, गणेश चाचर, प्रतिमा जगताप, विद्या जगताप, हेमलता जगताप यांनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक प्रवीण भापकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी तर आभार सोपान जगताप यांनी मानले.

Post a Comment

0 Comments