डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
आज गोबारस आणि रमा एकादशी एकाच मुहूर्तावर आले आहेत. हाच शुभमुहूर्त साधुन भारत दादाराम गावडे रा. पारवडी, ता. बारामती यांची देशी गाय, हिचे गोदान, नवनाथ भिमराव जगताप रा. जळगाव सुपे ता. बारामती या शेतकरी गोसेवकास, उज्ज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान, जळगाव सुपेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ जगताप यांच्यामार्फत आजच्या गोबारस मुहूर्तावर मोफत करण्यात येत आले. जगताप यांच्या हातून हे ११९ व्या गायीचे गोदान आहे.
शुक्रवार दि. १७ आक्टोंबर, रमा एकादशी आणि वसुबारस अर्थात गोबारस, हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी देशी गाय, या गायीचे आजच्या दिवशी परंपरेने विधीवत पूजा केली जाते, ती सुद्धा गायीच्या वासरासोबत तिची पूजा करुन गोमातेचे आर्शिवाद प्राप्त करून घेण्यासाठी भारत खंडात सर्वदूर आज गोमातापुजनाला विशेष महत्त्व आहे.
सर्व प्राण्यांची माता असलेल्या गायी, सर्वप्रकारच्या सुख देणारी आहेत. वरील श्लोकात गोमातेचे महत्व हेच सांगते कि गोमातेचे पालन पोषण करुन तिला आपल्या सानिध्यात सतत ठेवल्यास आपल्या कुटुंबाला, परिवारातील सर्व सदस्य यांना गोमाता नक्कीच सुखसमृद्धीचा आरोग्यभवचा अनमोल आर्शिवाद प्राप्त करून देते . उज्ज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान, जळगाव सुपे (ता. बारामती) याप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ जगताप यांनी गेली ८ वर्ष गोमातेची समाज बांधवाकडुन गोसेवा व्हावी, गोमातेचे आपल्या आयुष्यात किती मोलाचे महत्व आहे या सर्वदूर हेतूने आणि गोमातेचे आयुष्यभर योग्य रितीने पालनपोषण व्हावे या उद्देशाने प्रतिष्ठानमार्फत गोदान हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. आजपर्यंत त्यांनी ११८ देशी गायींचे गोदान केले आहे. दर महिन्याला पवित्र एकादशी तिथीला गोमातेचे दान करण्याचा संकल्प ते करतात आणि हा संकल्प दरवेळी पूर्णत्वास येतो. गोदान ज्यांना देणे आहे व ज्यांना गोदान घेणे आहे यांच्याकडून प्रतिष्ठानमार्फत स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते ते दोघांना बंधनकारक असते. गायीच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिचे पालनपोषण करण्याची जबाबदारी गोदान घेणारे यांची असते. पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकरी, गोपालक यांना आत्तापर्यंत ११८ गायींचे गोदान मोफत केले आहे.



Post a Comment
0 Comments