डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुर्टी याठिकाणी विविध भूमिपूजनांचा कार्यक्रम नुकताच पार पडला. हा कार्यक्रम बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
गलांडे पांडुळे वस्ती याठिकाणी सतोबा मंदिर सभामंडप, मुर्टी जेजुरी रस्ता ते गलांडे पांडुळे वस्ती रस्ता व श्री संत सावतामाळी मंदिर सभामंडप (गदादेवस्ती) आदी भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत असून ती कामे चांगल्या पद्धतीची व वेळेत पूर्ण व्हावीत असे राजवर्धन शिंदे व संभाजी होळकर यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी लालासाहेब नलावडे, संतोष शिंदे, माणिक काळे, मुर्टीच्या सरपंच कोमल जगताप, उपसरपंच किरण जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब जगदाळे, हरिदास जगदाळे, प्रियांका गदादे, छबनबुवा राजपुरे, संभाजी चव्हाण, नानासाहेब गदादे, साहेबराव गलांडे, सतीश जगदाळे, प्रशांत जगदाळे, दीपक जगदाळे, निलेश शेलार, दिनेश भोसले, पोलीस पाटील तृप्ती गदादे, ग्रामसेविका रोहिणी पवार तसेच गलांडे पांडूळे व गदादे वस्तीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments