Type Here to Get Search Results !

मोरगावात रंगली संगीतमय दिवाळी पहाट

 



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील अष्टविनायकाचे आद्य तीर्थक्षेत्र मोरगाव मंदिरासमोरील प्रांगणात मंगळवार (दि. 21) रोजी पहाटे सुमधुर भक्ती गीते व भावगीतांनी दिवाळी पहाट संगीतमय झाली.
या संगीतमय पहाटेचा आनंद मोरगाव व पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांनी घेतला. संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत सप्तसूर म्युझिक अकॅडमीचे मुख्य गायक योगेश जैन व सहकारी यांनी आपली कला यावेळी सादर केली.



संगीतमय दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात मराठी हिंदी भक्तीगीतं, देशभक्तीपर गीते, भावगीते, गजलांचा संगीतमय बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुरमई दिवाळी पहाटेसाठी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कुंभार सर यांनी केले.



Post a Comment

0 Comments