डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी श्री सिद्धनाथ पशुखाद्य सप्लायर्स या दुकानात कामधेनु कंपनीकडून पशुपालक शेतकऱ्यांना दिवाळीची मिठाई वाटप करण्यात आली.
शेतकऱ्यांना यावेळी कामधेनु ॲग्रोवेट कंपनीकडून पशुखाद्याची माहिती देण्यात आली. जनावरांच्या दूध वाढीसाठी काय केले पाहिजे, काय काळजी घ्यावी. त्यावेळी शेतकऱ्यांनीही त्यांच्या अडचणी सांगितल्या.
यावेळी कामधेनु कंपनीचे सहाय्यक उपाध्यक्ष समीर पाटील साहेब, सेल्स ऑफिसर (बारामती) सुरज सोलनकर आणि कामधेनु कंपनीचे डीलर संतोष गडदरे यांच्यासह पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments