डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या वडगाव निंबाळकर गणातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या चर्चेचा विषय ठरलेले नाव म्हणजे सुखदेव शिंदे. गेली वीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी अखंड निष्ठा ठेवत कार्यरत असलेले शिंदे हे पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांशी घट्ट नातं यासाठी ओळखले जातात.
श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजमन जिंकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असो वा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम असो सुखदेव शिंदे यांनी सदैव जनसेवा ही केंद्रस्थानी ठेवली आहे.
त्यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी, वृक्षारोपण उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, तसेच पूरग्रस्त आणि कोरोना काळातील गरजूंना मदत असे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या त्यांनी पार पाडले आहेत.
वडगाव निंबाळकर या गणात सुखदेव शिंदे हे सर्वसामान्यांतून पुढे आलेले, समाजाशी नाळ जोडून ठेवणारे आणि खरं तर जनतेच्या मनातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैलीमुळे गोरगरीब, शेतकरी आणि तरुणवर्ग यांच्यात त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.
सध्या वडगाव निंबाळकर गणात सामान्य नागरिकांमधून एकच चर्चा आहे —"पक्षाचे खरे कार्यकर्ते सुखदेव शिंदे यांना संधी द्यावी!"
जनतेच्या मनातून उमटणारा हा आवाजच त्यांच्या कामाची खरी पावती ठरत आहे.

Post a Comment
0 Comments