डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पांढरवस्ती येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या (सन २००१-२००२) इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. एस. फरांदे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक शिवराम गाडेकर, माजी मुख्याध्यापक आर. एन. भंडलकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी विद्यार्थी राहुल गाडेकर यांनी तर सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व वाकीचे विद्यमान सरपंच किसन बोडरे यांनी केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नंतर सर्व मुलांचा परिचय करून संतोष टकले, सोमनाथ माने, राहुल साळुंखे व योगेश मासाळ या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर मुलींच्यामध्ये सुवर्णा पवार, कविता गाडेकर, सपना नवले, मोना माकर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्यामध्ये एस.जी. शेंडकर, माजी मुख्याध्यापक भंडलकर सर, व अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक फरांदे सर यांनी केले. व आभार व्ही. सी. ननवरे यांनी मानले. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. गेल्या २३ वर्षानंतर विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा होत असल्याने पुन्हा सर्वजण जुन्या आठवणींमध्ये रमले व जुनी शाळा पुन्हा एकदा भरली. पुन्हा वर्ग भरला व डोळ्यासमोर खेळ रंगले. जुने मित्र नव्या रंगात, नव्या ढंगात दिसले. कोणी पीएसआय झाला, कोणी मॅनेजर झाला, कोणी प्राध्यापक झाला, तर कोणी सरपंच, माझा शेतकरी व दुग्ध व्यवसाय करणारा झाला पण ते सर्व आपापले व्यवसाय व डिग्र्या घरी ठेवून आपले जुने सवंगडी, वर्गमित्र म्हणून एकत्र भेटले व एक शाळेचे आपुलकीचे नातेसंबंध म्हणून सर्वांनी शाळेला व्हाईट बोर्ड भेट दिला. आणि सर्वांनी संपूर्ण दिवस आपल्या बालपणातील एक आठवणीचा क्षण म्हणून लहान बनून जगले, हसता हसता थोडे रडले सुद्धा. प्रत्येकाने एकमेकांची विचारपूस, सुखदुःख, आठवणी एकमेकांना सांगत, एकमेकांचे चेहरे आठवत दिवसाचा शेवट करत हळूहळू शाळेचा निरोप घेत सर्वजण पुन्हा एकदा संसाररूपी शाळेकडे निघाले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी शाळेचा निरोप घेतला.
यावेळी सी.आर. मुळीक, के.जी. जगताप, श्रीमती जी.जी. धायगुडे, जे.ए. भगत, ए. डी. भापकर, डी.पी. जगदाळे, वाय डी. तांबोळी, एस.व्ही.सावळकर, पी.एन. निगडे, आर.एम. साळुंखे, बी.एस. भोसले, व्ही डी. जगताप, डी.बी. भोसले, एस. बी. मदने, एस. बी. कोकरे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी वाकीचे विद्यमान उपसरपंच इंद्रजीत जगताप, गणेश पवार, खंडेराव कुंभार, राहुल चांदगुडे व वैशाली गाडेकर यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments