पुणे जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती बारामती " मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान " आरोग्य विभाग व ग्रामपंचायत सायंबाचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमिया मुक्त गाव अभियान राबविण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य शिबीर घेण्यात आले.
हा कार्यक्रम बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक नवले, आरोग्य विस्तार अधिकार सुनील जगताप, विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, हिमोग्लोबिन आदी बाबींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी एकल महिलांना साडीचोळी व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप तसेच दिव्यांगांना चेक वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय स्वप्रकल्प पाहणी, स्वयंभू मंदिर परिसर सुधारणा कामकाज पाहणी, जिल्हा परिषद व अंगणवाडी सीसीटीव्ही पाहणी, "प्रधानमंत्री घरकुल आवास योजना" अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे गृहप्रवेश व समाज मंदिर, सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम आदी कामाची यावेळी पाहणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी सायंबाचीवाडीचे सरपंच जालिंदर भापकर, उपसरपंच हनुमंत बांदल, ग्रामपंचायत अधिकारी युवराज गावडे, ग्रामपंचायत सदस्य रामदास भापकर, ग्रामपंचायत सदस्या दिपाली भापकर, सविता भगत, सामाजिक कार्यकर्ते मनोहर भापकर, जेष्ठ नागरिक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने शिबिरास उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments