Type Here to Get Search Results !

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या धर्तीवर नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या अध्यक्षतेखाली बारामती तालुका पक्ष संघटना व सर्व सेल अध्यक्षांची आढावा बैठक संपन्न झाली.

 नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप बांदल यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या धर्तीवर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडवी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो व खासदार सुनेत्रावहिनी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकदिलाने काम करावे व संघटन मजबूत करावे असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.

  यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष धनवान वदक, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष संभाजी होळकर, महिला अध्यक्षा ज्योतीताई लडकत, युवक अध्यक्ष राहुल वाबळे, वकील संघटनेचे रवींद्र माने, सोशल मीडिया अध्यक्ष सूर्यकांत पिसाळ, शिक्षक संघटना अध्यक्ष नागनाथ ठेंगल, दिव्यांग सेलचे हरिभाऊ जाधव, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रोहन गायकवाड, ओबीसी सेलचे दादाराम झगडे, अल्पसंख्यांक सेल मुनीरभाई बागवान, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments