डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
विद्यार्थी दिनाच्या औचित्याने भैरवनाथ एकता ग्रुप व दलित पँथर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणी भापकर (ता. बारामती) येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पाहायला मिळाली.
या उपक्रमामागील हेतू सांगताना दलित पँथरचे अध्यक्ष अविनाश बनसोडे म्हणाले की, “लहान मुलांमध्ये लहानपणीच लेखनाची आवड निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. वह्या मिळाल्याने सराव आणि अभ्यासाची प्रेरणा वाढते. याच दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.”
या कार्यक्रमास बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल भापकर, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, विद्यमान सदस्य नंदकुमार मदने, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज मदने, सामाजिक कार्यकर्ते अमोल मदने, कॉन्ट्रॅक्टर ऋषीकेश भापकर, बालासो भापकर, प्रतिक पांडेकर, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली गायकवाड आणि शिक्षिका सुप्रिया यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षिका आणि पालकांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.


Post a Comment
0 Comments