Type Here to Get Search Results !

पंचक्रोशी प्रकाशनच्या वतीने दीपावली काव्य मैफिल व दीपावली अंक प्रकाशन सोहळा कार्यक्रम संपन्न

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

पंचक्रोशी प्रकाशन बारामती यांच्या वतीने दीपावली काव्य मैफिल व दीपावली अंक प्रकाशन सोहळा हा कार्यक्रम कोऱ्हाळे नजीक खामगळवाडी पाटी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय या ठिकाणी नुकताच संपन्न झाला.

 बारामती तालुक्यातील कवि-कवयित्री एकत्र करुन बारामतीची एक आगळीवेगळी ओळख करुन कविवर्य मोरोपंताची बारामती ही ख-या अर्थाने साहीत्य पंढरी आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आले.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द गझलकार प्रमोदजी जगताप हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाट्यपुस्तकातील लेखीका व अभिनेत्री अंजली अत्रे व महाराष्ट्र राज्य पाट्यपुस्तक निर्मीती मंडळ, पुणे येथील मा. विषेशाधिकार मोगल जाधव तसेच सुप्रसिध्द रानकवी लक्ष्मणजी शिदे हे उपस्थित होते.

‘आम्ही बारामतीकर‘ या अंकांचे प्रकाशन सिद्धीविनायक ऊद्योग समुहाचे अध्यक्ष ह.भ.प दत्तात्रय गावडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. 

 या कार्यक्रमासाठी संपादक बाळासाहेब कर्चे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व असेच कार्यक्रम त्यांच्या हातून होत राहावे अशी मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केली.



यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. जेष्ट साहित्यिक प्रा. रविंद्र कोकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये कविसम्मेलन वा साहित्यिक कार्यक्रम का असावा तसेच वाचन चळवळ का असावी याविषयी कोकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 कवि संमेलनामध्ये बारामती पंचक्रोशीतील एकुण ७६ सारस्वंतानी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये प्रामुख्याने पाठ्यपुस्तकातील कवी हनुंमत चांदगुडे, सोमनाथ सुतार, अभिमन्यु भगत, सोपानराव आटोळे, संजय मोरे, द.सु भोसले, वनिता जाधव, सुजाता शिंदे, संगीता देशमुख, स्वाती सोरटे, संध्या सातपुते, ऊर्मिला झगडे, कांतीका वसेकर, निलीमा सोरटे, आम्रपाली धेंडे, इंदुमती गायकवाड, स्वाती केंजळे, सुरेखा गायकवाड इत्यादींनी आपल्या कविता सादर करुन उपस्थितांचे मने जिंकली. 

 निवेदक म्हणुन जयश्री माजगावकर व राहुल शिंदे यांनी सूत्रसंचालन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. अलका रसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments