डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पुण्यामध्ये बांधकाम क्षेत्रात मोठे नाव असलेली नामांकित कंपनी मॅजेस्टिक लँडमार्क रायझिंग सन एलएलपी यांनी सुपर ट्रेकर्स वेल्फेअर ट्रस्ट लोणी भापकर यांच्या माध्यमातून लोणी भापकर येथे प्लांट डोनेशन अँड प्लांटेशन असा दरवर्षी कार्यक्रम घेतला जातो. मागच्या दोन वर्षाच्या झालेल्या कार्यक्रमांमध्ये कंपनीने या परिसरात मोठ्या प्रमाणावर फळझाडांचे वाटप व लागवड केली होती.
न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर इयत्ता दहावी या बॅचला यांनी सहा ते सात फूट उंचीच्या वेगवेगळ्या फळझाडांचे वाटप केले होते. यामध्ये जांभळ, आंबा, चिंच, पेरू या झाडांचा समावेश करण्यात आला होता. मुलांनी अतिशय चांगली काळजी घेऊन ही झाडे जपली आहेत. त्यामुळे लोणी भापकरच्या परिसरात फळझाडांचे प्रमाण चांगले वाढलेले आहे. सुपर ट्रेकर्स वेल्फेअर ट्रस्ट लोणी भापकर व समस्त ग्रामस्थ लोणी भापकर यांच्यातर्फे कंपनीचे ओनर अंकित छाजेड, ॲड.गणेश सारडा, साईट मॅनेजर, गौरव मेहता, संभाजी पवार यांचे आभार मानण्यात येत आहेत अशी माहिती सुपर ट्रेकर्स वेल्फेअर ट्रस्ट लोणी भापकरचे सदस्य जयदीप भापकर यांनी दिली.

Post a Comment
0 Comments