लोणी भापकर : पुढारी वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील ग्रामपंचायतमध्ये बलुतेदार संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीने रस्त्याच्या कडेला दुतर्फा वाढलेली झाडे काढण्याबाबत नुकतेच निवेदन दिले आहे.
लोणी भापकर हद्दीतील लोणी भापकर ते दत्तमंदिर रस्ता तसेच तरडोली रस्ता, तुकाईनगर कडे जाणारा रस्ता, लोणी भापकर ते बारवकरवस्ती व लोणी भापकर ते भोसलेवस्ती या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे वाढलेली आहेत. रस्त्याने येता जाताना शाळकरी मुले, दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या, सायकलस्वार, दुचाकी, चारचाकी अशा सर्वच वाहनांना या काटेरी झुडपांचा त्रास होत आहे. समोरासमोर दोन वाहने एकत्र आल्यास या काटेरी झुडपांचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना प्रवास करताना त्रास होत असून अनेक रस्त्यांना साईड पट्ट्याही राहिलेल्या नाहीत. या गोष्टींचा विचार करून लोणी भापकर ग्रामपंचायतीने ही काटेरी झुडपे काढून टाकावीत अशा पद्धतीचे निवेदन नुकतेच बलुतेदार संघटना व समस्त ग्रामस्थ लोणी भापकर यांच्या वतीने देण्यात आले आहे अशी माहिती दादा कडाळे, धीरज आवाडे, विशाल भापकर, अमोल बारवकर, प्रताप कडाळे व खाजगी पशु चिकित्सक डॉ.किरण ठोंबरे यांनी दिली आहे.
फोटोओळी : लोणी भापकर ते तुकाई नगर रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे.(छाया : काशिनाथ पिंगळे)


Post a Comment
0 Comments