Type Here to Get Search Results !

लोणी भापकर येथे ग्रामसेविकेच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील लोणी भापकर ग्रामपंचायत याठिकाणी गटविकास अधिकारी यांच्यासमोर अडचणी सांगत असताना ग्रामसेविकेने कानशिलात मारील, मुस्काडात देईन अशी भाषा वापरल्याने ग्रामसेविकेच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी यासाठी बुधवार दि. 26 नोव्हेंबर पासून मनोज साठे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

 यानंतर ग्रामसेविकेच्या विरोधात बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे साठे यांनी तक्रार केली होती परंतु यावर दखल घेतली नाही. यासंदर्भातील तक्रारींची दखल न घेतल्यामुळेच आपल्याला हे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.



    जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही किंवा ग्रामसेविकाच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत आपल्या आंदोलन सुरूच राहील असे साठे यांनी सांगितले. 

   यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनीही आंदोलन स्थळी भेट दिली.ग्रामसेविकेने केलेले हे वर्तन चुकीचे असल्याने लोणी भापकरच्या ग्रामसेविका उज्वला शिंगाडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे व अशा प्रकारची गैरवर्तुणुक त्यांच्याकडून होऊ नये. तसेच त्यांनी केलेल्या वर्तणूकीबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असेही यावेळी कोकरे यांनी सांगितले. आंदोलनाचा आजचा पहिला दिवस असल्याने याकडे शासकीय अधिकारी कुणी फिरकले नाहीत. मात्र याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी नाहीतर यानंतर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे यावेळी मनोज साठे यांनी सांगि

तले.

Post a Comment

0 Comments