Type Here to Get Search Results !

मुढाळे गणातून बारामती पंचायत समितीसाठी रूपाली कल्याण जाधव या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून इच्छुक

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

मुढाळे गणातून बारामती पंचायत समितीसाठी रूपाली कल्याण जाधव या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून उमेदवारी घेऊन प्रस्थापितांना शह देण्यासाठी इच्छुक आहेत. यावेळी जनता नक्कीच साथ देईल अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे. विविध कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. बारामती तालुक्यातून मुढाळे या गणामध्ये विरोधकाची भूमिका कल्याण जाधव यांनी पार पाडली आहे. कोरोना कालावधी रुग्णांना, नागरिकांना सहकार्य केले. आठवडे बाजार उभारणीसाठी प्रयत्न केले. प्रशासन दरबारी पक्षाच्या माध्यमातून विविध व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु विरोधी पक्षांमध्ये काम करत असताना तालुका पातळीवर प्रतिनिधित्व मिळावं आणि या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. खरं म्हणजे डॉ. बाबासाहेबांचे एक वाक्य याठिकाणी त्यांनी उद्रृत केले की देशात जर लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. त्याच पद्धतीने तालुका पातळीवर असेल, गाव पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल किंवा राज्यपातळीवर असेल विरोधी पक्ष सक्षम असला तरच सत्ताधाऱ्यांना लोकशाहीच्या चाकुरीमध्ये काम करून घेण्याचा व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत असतो आणि त्यामुळे लोकशाहीचा समतोल राखला जातो असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. म्हणून या गणातून सर्वसामान्य जनतेने मला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी आणि विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यासाठी व आपले जनतेचे प्रश्न प्रशासन दरबारी मांडण्यासाठी एक संधी उपलब्ध करून द्यावी असं आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. पक्षफुटी होत असताना ठामपणे विचारांसोबत राहिलेले कल्याणराव जाधव यांनी पक्ष मजबुतीसाठी तालुक्यामध्ये अनेक तरुणांशी संवाद साधून पक्षासाठी काम केल्याचे देखील बोलले जात आहे. या गणातील काही राहिलेली विकास कामे या संधीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन तरी मला मतदारांनी एक वेळ संधी देऊन पहावी असे आव्हान त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments