Type Here to Get Search Results !

लोणी भापकर येथे जागतिक मृदा दिवस साजरा

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

लोणी भापकर (ता.बारामती) येथे भारत सरकारच्या माळेगाव खुर्द येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस

प्रबंधन संस्था व ग्रामपंचायत लोणीभापकर यांच्या वतीने जागतिक मृदा दिवसाचे औचित्य साधून लोणीभापकर येथील अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांच्या शेतातील माती परिक्षण करुन त्याचा अहवाल व लाभार्थ्यांना किचन संचाचे वाटप करण्यात आले.

 हा कार्यक्रम संस्थेचे डायरेक्टर डॉ.के.सामी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. रेड्डी यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन केले.



 याप्रसंगी डी. ए. पी. एस. सी.समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन कुराडे, लोणी भापकरचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भापकर, कृषी अधिकारी बापूराव लोधाडे, समितीचे सदस्य डॉ.के.पाल, डॉ.जे.एस. कदम, डॉ.डि.नागरे, डॉ. राजगोपाल, आदित्य वाघमारे, रोनित कदम, दलित पँथर तालुकाध्यक्ष अविनाश बनसोडे, पदमनाथ कडाळे, राणबा मोरे, सचिन कांबळे त्याचबरोबर काही ग्रामस्थही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments