डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस नाईक निखिल रणदिवे शुक्रवारच्या दुपारी मोबाईल वर स्टेटस ठेवत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे
माझी प्रिय दिदी आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पीटल मध्ये घेवुन जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली ०१ वर्षापासुन सतत त्रास देत आहे. माझा नाई विलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझेकडुन दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा असा भावनिक स्टेटस स्वतःच्या मोबाईलवर ठेवत पोलिस नाईक निखिल रणदिवे हे शुक्रवार दुपारपासून बेपत्ता झाले आहेत.
यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे बोलताना म्हणाले की, त्यांची बदली शिक्रापूर येथे झालेली आहे आणि त्यांनी मला कधीही सोडा असे सांगितलं नव्हतं. रणदिवे मला बोलले नाही सोडा तरी ही मी सांगितलं होतं त्यांना सोडतो म्हणून असे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले असून तरीसुद्धा पोलिस नाईक निखिल रणदिवे यांच्या स्टेटसमधून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्रास दिल्याचं त्यांच्या मोबाईल स्टेटसवरून दिसून येत आहे. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून ते बेपत्ता झाले आहे असे दिसून येत आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी 4 पथक रवाना केली आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.


Post a Comment
0 Comments