डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निरा बारामती रोडवर असलेल्या निक्सा हब सस्तेवाडी याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे औद्योगिक सेलचे बारामती तालुका उपाध्यक्ष व निक्सा ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन निलेश दिलीप गायकवाड यांच्या वतीने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीशमामा खोमणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बारामती तालुकाध्यक्ष राजेंद्र बापू जगताप हे उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरावेळी 75 बॉटलचे रक्त संकलित करण्यात आले तर नेत्र तपासणी शिबिरात 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments