डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
परंडवाल क्रिकेट संघाने सुपर लीगमध्ये अव्वल स्थान पटकावल्यानंतर नुकतेच मोरगाव याठिकाणी येऊन श्री मयुरेश्वराचे दर्शन घेतले.
सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या 14 वर्ष वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या क्वालिफायर राउंड मध्ये परंडवाल क्रिकेट संघाची 55 संघामध्ये लढत झाली. यात एकही सामना न गमवता अव्वल स्थान पटकावले आणि एमसीएच्या इनविटेशन स्पर्धेत सहभागी असलेल्या 52 संघात स्थान मिळवले. आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवत या स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत धडक मारली अशी माहिती या संघाचे कर्णधार नचिकेत गीते, सलामी फलंदाज पार्थ धायगुडे, स्वराज पिंगळे आणि मध्यम फळीतला आक्रमक फलंदाज चंदन मांझी यांनी दिली.
या संघाचा धडाकेबाज सलामी फलंदाज तरडोली गावचा सुपुत्र पार्थ धायगुडे हा चार शतकांसह 826 धावा करून संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चौथ्या क्रमांकावर असला तरी उर्वरित सामन्यात आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तो संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावेल असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक सुरेंद्र यादव यांनी बोलून दाखविला.
या संघासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिटनेस कोच प्रतुल्ल रॉय तसेच सहकारी प्रशिक्षक चंदनकुमार व नरेंद्र यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सुपर लीग राउंडमध्ये आपल्या गटात अव्वल स्थान पटकावून सेमी फायनल मध्ये जागा पक्की केल्यानंतर या संघाने मोरगाव येथील श्री मयुरेश्वराचे दर्शन घेतले व लवकरच राहिलेले बाकीचे सामने जिंकून सर्वोच्च स्थान मिळवून पुन्हा एकदा श्री मयुरेश्वराचे दर्शनाला येऊ असे सांगितले.
फोटोओळी : श्री मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर परंडवाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक व टीम.


Post a Comment
0 Comments