Type Here to Get Search Results !

लोणी भापकर येथे पानिपत शौर्य दिन उत्साहात

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील लोणी भापकर याठिकाणी 14 जानेवारी रोजी पानिपत मराठा शौर्य दिनाचे औचित्य साधून भैरवनाथ मंदिरात ग्रामदैवत भैरवनाथाची पूजा करून सर्व ग्रामस्थांनी हा दिन उत्साहात साजरा केला. तसेच या ठिकाणी असलेल्या सती गेलेल्या सतीमातांचे पूजनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 



  सरदार सोनजी गोरखोजी भापकर आणि त्यांचे बंधू या हुतात्म्यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांचे पूजन करण्यात आले व इतिहासाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.



  याप्रसंगी लोणी भापकर, माळवाडी, सायंबाचीवाडी, चौधरवाडी, तरडोली इत्यादी गावातील अनेक मान्यवर, भापकर बंधू तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments