Type Here to Get Search Results !

वडगाव निंबाळकर पंचायत समिती गणातून शशांक पवार इच्छुक

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पंचायत समिती गणातून सदस्यपदाच्या उमेदवारीसाठी उच्चशिक्षित, युवा नेतृत्व, चौधरवाडी गावचे विद्यमान सरपंच शशांक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका अध्यक्ष संदीप बांदल यांचेकडे मागणी अर्ज केला आहे.



 चौधरवाडी गावातील चाळीस वर्षाचा राजकीय व सामाजिक सेवेचा वारसा लाभलेले हे पवार कुटुंब असून शशांक यांना लहानपणापासूनच राजकीय व सामाजिक कार्याची आवड आहे. ते उच्चशिक्षित कुटुंबतील उच्चशिक्षित उमेदवार BE MECHANICAL आहेत.

सामाजिक कार्य करत असताना गावच्या नवतरुण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मंडळाचे अध्यक्ष असताना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडून उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला होता. शशांक पवार यांनी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासारखे उपक्रमांमधून त्यांची जनतेशी नाळ जोडली गेली आहे. याचकाळात त्यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये धावून येणारे नेतृत्व म्हणून पंचक्रोशी मध्ये त्यांची ओळख आहे.  

 शेती व दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये प्रवेश केला. वडगाव निंबाळकर व मोरगाव परिसरातील असंख्य लोकांशी सहकारातून हितसंबंध जोडले गेले आहेत.

चौधरवाडीतील सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम त्यांनी केले आहे.

चौधरवाडीतील जनतेने सामाजिक कार्याची दखल घेत नेतृत्व करण्याची संधी देत 2023 साली लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांची निवड देखील केली. सरपंचपदी निवड झाल्यानंतर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली चौधरवाडी सारख्या छोट्या गावामध्ये 4.30 कोटींची विकास कामे करण्यात येत आहेत. कृतिशील विचारधारेतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास कामे पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 35 घरकुलांची मंजुरी घेतली गेली आहे. चाळीस वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवन्यात यश आले आहे.

 अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि संभाजी होळकर व राजवर्धन शिंदे यांच्या सहकार्यातून भविष्यातील गरज ओळखून 2500 स्क्वेअर फुटांच्या भव्य मल्टीपर्पज हॉलच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. सोमेश्वर पंचक्रोशीतील सांप्रदायिक व सांस्कृतिक वारसा जपत दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन, समाज प्रबोधन, महिला सक्षमीकरण व सबलीकरणावर भर देण्यात येत आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सोमेश्वर पंचक्रोशीतील महिलांसाठी विनामूल्य मोफत महिला देवदर्शन, यात्रांचे आयोजन करण्यात येते. प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी ते नेहमी आग्रही असतात. सोमेश्वर पंचक्रोशीतील तरुणांना रोजगार व व्यावसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात.

 वडगाव निंबाळकर पंचायत समिती गणातील करंजे, मगरवाडी, वाकी, चोपडज, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बु, थोपटेवाडी व चौधरवाडी ग्रामस्थांकडून उमेदवारीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ग्रामस्थांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुशिक्षित युवा नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी मागणी केली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, ग्रामविकास, सांस्कृतिक, औद्योगिक, शेती व तंत्रज्ञान या सर्वांची जाण असणारे व सर्वसामान्य जनतेला आपले वाटणारे सुशिक्षित, युवा नेतृत्वाची राहिलेली कामे या माध्यमातून करण्याची इच्छा असून पक्षातर्फे संधी मिळावी अशी मागणी अर्ज शशांक पवार यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments