Type Here to Get Search Results !

लोणी भापकरच्या शोकसभेत अजितदादांना श्रद्धांजली - काम करणारा नेता हरपला



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील लोणी भापकर याठिकाणी श्री भैरवनाथ मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. 

   लोणी भापकर व परिसरातील अनेक ग्रामस्थांनी यावेळी अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दादांच्या आठवणी सांगितल्या. असं व्हायला नको होतं, आत्ता बारामतीचा विकास थांबणार, आत्ता एवढा निधी येऊ शकणार नाही तसेच राहिलेली कामंही पूर्ण होतील की नाही याबद्दल साशंकता निर्माण केली. तसेच सर्वांचा आधारवड हरपला. दादांना श्रद्धांजली व्हायची वेळ आपल्यावर येईल असे अनेकांना वाटलं नव्हतं. अजितदादा सारखा नेता याआधी झाला नाही आणि इथून पुढे होईल असंही वाटत नाही अशी शंका अनेकांनी बोलून दाखवली. दादांच्याकडे गेल्यानंतर काम होणार याची खात्री अनेकांना असायची. दादा स्पष्ट बोलणारी व्यक्ती होती तसेच ती कामाची व्यक्ती होती. अशा वेगवेगळ्या शब्दात अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दादाबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या. याप्रसंगी अनेकांचे मनं गहिरून गेली तर काहींना अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



   यावेळी सर्वच पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments