डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक सन २०२६-२०३० या निवडणुकीमध्ये वडगाव निंबाळकर मोरगाव जिल्हा परिषद गटासाठी एकूण पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
यामध्ये अश्विनी रामदास खोमणे, ज्योती विकास गाडे, रोहिणी संदीप ढोले (कदम), आरती मधुकर लोखंडे, गीतांजली शिवाजी सोनवणे असे एकूण ५ उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत.
तर मोरगाव पंचायत समिती गणासाठी बाबा रामा चोरमले, रामदास चंद्रकांत नवले, बाळासाहेब मारुती बालगुडे असे एकूण ३ उमेदवार आपले नसीब आजमावत आहेत.
तर वडगाव पंचायत समिती गणासाठी राकेश बबन गायकवाड, जितेंद्र भगवान पवार, दयानंद मोतीराम पिसाळ, बापूराव ज्ञानदेव फणसे, असिफ लतीफ शेख, मनोज सोपान कोकणे, अजित प्रल्हाद जाधव असे एकूण ७ उमेदवार आपले नसीब आजमावत आहेत.
मतदान दोन- तीन दिवसांवर आले असून उमेदवार हे घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. उमेदवार प्रत्येक गावात घरोघरी जाऊन आपली ओळख तसेच चिन्हांचीही ओळख करून देत आहेत. अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे प्रचाराचा आवाज, सभा किंवा गाजावाजा मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. कोपरा सभा, घोंगडी बैठका किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन प्रचार सध्या सुरू आहे. मोठ्या नेत्यांच्या कुठेही सभा होताना दिसत नाहीत. सोशल मीडिया तसेच भेटीगाठीवर जास्त प्रमाणात भर दिला जात आहे.



Post a Comment
0 Comments