Type Here to Get Search Results !

महाशिवरात्रीनिमित्त श्री सोमेश्वर देवस्थान येथे रक्तदान; श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे समाजकार्यात सातत्यपूर्ण योगदान

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

महाशिवरात्री तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री सोमेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित या उपक्रमास सोमेश्वर पंचक्रोशीतील भाविक, युवक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ७५ बॉटल रक्त संकलन करून मानवतेचा संदेश दिला.

    या रक्तदान शिबिरासाठी बालाजी ब्लड बँक सेंटर लोणंद यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. अनिकेत उघडे, समाधान माने-देशमुख (जनसंपर्क अधिकारी), गौरी काळे (टेक्निशियन) तसेच वैद्यकीय कर्मचारी यांनी सुरक्षित, शिस्तबद्ध व वैज्ञानिक पद्धतीने रक्तसंकलन प्रक्रिया पार पाडली.

   श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था मागील सहा वर्षांपासून नियमित रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती व समाजोपयोगी उपक्रम राबवत असून परिसरात सेवाभावाची मजबूत परंपरा निर्माण करत आहे. या उपक्रमांमुळे अपघातग्रस्त, रुग्णालयातील रुग्ण व आपत्कालीन परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



   संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानताना सांगितले की, “आपल्या सहकार्यामुळे समाजकार्याला प्रेरणा मिळते. रक्तदान ही केवळ सेवा नसून जीवनदान देण्याची महान भावना आहे.” त्यांनी युवकांनी अशा सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी व्हावे असेही आवाहन केले.

  हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व सेवाभावाने परिपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदान करून करण्यात आली. 

   यावेळी विद्यमान सरपंच भाऊसाहेब हुंबरे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आनंद मोकाशी, सचिव विपुल भांडवलकर, करंजे गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड, विश्वस्त मोहन भांडवलकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर, खजिनदार सचिन भांडवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रतापराव गायकवाड, सोमेश्वर देवस्थानचे पुरोहित ऋषिकेश घोलप तसेच आजी-माजी पदाधिकारी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.

Post a Comment

0 Comments