डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार समाजातील दानशूर व्यक्तींनी अथवा सामाजिक संस्था, व उद्योग कंपनी यांनी क्षयरुग्णांना दत्तक घेऊन औषधोपचार कालावधी (६ महिने) मध्ये रुग्णांनी सकस आहार घेऊन क्षयरोग मुक्त व्हावे या उद्देशाने रुग्ण दत्तक घेऊन त्यांना ६ महिने पर्यंत पोषण आहार किट देण्याकरिता समाजातील व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
त्यानुसार सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालय बारामती व संपूर्ण बारामती तालुका अंतर्गत असणाऱ्या निवडक क्षयरोग रुग्णांना दि.२४ फेब्रुवारी रोजी अष्टविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, मोरगाव १२ रुग्ण व सचिन दामाजी पाटील यांच्यामार्फत २ रुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार किट देण्यात आले.
यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी अष्टविनायक चॅरिटेबल ट्रस्ट व सचिन दामाजी पाटील यांचा आदर्श घेऊन समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी क्षयरूग्णांना दत्तक घेण्याचे आव्हान केले. सदर कार्यक्रमाकरिता सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते मंगेश खताळ, अष्टविनायक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल कांबळे, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव सचिन कांबळे, अश्विनीताई कांबळे निक्षय मित्र सचिन दामाजी पाटील, पर्यवेक्षक एम.एम.मोहिते, एस.के.येळे, औषध निर्माण अधिकारी दीपक बोबडे, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अमरसिंह वाबळे तसेच क्षयरूग्ण लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments