डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
"ओबीसींचा म्होरक्या संसदेत"
राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून आता नवीन निवडून जाणारे सहा खासदार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
वास्तविक राज्यसभा ही वंचित, शोषित, पीडित समाजातील प्रतिनिधित्व त्या सभागृहात असावे, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा अनुभव -अभ्यास देशाच्या धोरणात उपयोगी पडावा, तळागाळातील तसेच विविध समस्या देशाच्या पटलावर मांडून लोकशाही अधिक घट्ट करण्यासाठी राज्यसभा असली पाहिजे असा प्रवाह आहे.
परंतु या अगोदर अनेकांना राज्यसभा दिल्या गेल्या परंतु त्याचा उपयोग किती झाला हा संशोधनाचा विषय आहे, किती राज्यसभा खासदार लोकांच्या लक्षात आहेत ते देखील शोधणे गरजेचे आहे. परंतु या सर्वांच्या मध्ये सध्या चर्चेत असलेले व संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी ओबीसींना जागृत केले हक्क अधिकाराची जाणीव करून दिली व ओबीसींच्या चळवळीचा एक इफेक्टिव्ह पॅटर्न ज्यांनी उदयास आणला व सभागृहातील ओबीसींची चळवळ ज्यांनी रस्त्यावर आणून लाखोंची गर्दी खेचली असे प्रा.लक्ष्मण हाके यांचे नाव सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात राज्यसभेच्या उमेदवारासाठी चर्चिले जात आहे.
त्यामागचे कारण ही तितकेच महत्त्वाचे आहे कारण महाराष्ट्र मध्ये गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वत्र ओबीसी भटके विमुक्त समाज हा मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या समस्या ही अतिशय गंभीर आणि प्रलंबित असल्याने त्यांच्या असंतोषाचा विस्फोट लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाच्या रूपाने महाराष्ट्राच्या व देशाच्या समोर आला.
वास्तविक या सर्व ओबीसींच्या समस्यांचा अभ्यास लक्ष्मण हाके यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ज्या तडफेने हिरीरीने ओबीसींच्या प्रश्नावर काम केले ओबीसीची वस्तीग्रह, ओबीसींच्या शाळा ते ओबीसींच्या वाडी वस्ती तांड्यावरील समस्यांचा इत्यंभूत अभ्यास केल्यानंतर त्यांनी बेभान होऊन ओबीसींच्या संघर्षाचा तांडव महाराष्ट्रामध्ये उभा केला.
इतिहासात महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या असंतोषाला तोंड फोडले, आता जर हा ओबीसीचा मोठा समूह दुजाभावाच्या अथवा डावलण्याच्या भावनेच्या गर्तेत गेला तर त्याचा खूप मोठा फटका सत्ताधारी वर्गाला बसू शकतो.
म्हणून या असंतोषाचे जनक लक्ष्मण हाके राज्यसभा खासदार पदी वर्णी लावून या सर्व समूहाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे त्यांच्या विकासासाठी योजनांची पुनर्निर्मिती करणे व जटिल समस्या सोडवण्याकरता या सर्व गोष्टींचा अभ्यास असलेले सुशिक्षित तरुण उत्तम वकृत्व व त्याचबरोबर तळागाळातील ओबीसी, मायक्रोओबीसी, भटक्या विमुक्त यांच्या जाती, उपजाती, सण, परंपरा, चालीरीती, रूढी, उत्सव, देव-देवाक, आडनावे जातपंचायती याचा सखोल अभ्यास असलेले महाराष्ट्रातील अनेक वाड्या, वस्त्या, तांडे पायाला भिंगरी लावून ज्यांनी पालथे घातले त्यांचा अभ्यास केला त्यांना आपलंसं केलं बोलतं केलं समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला अशा म्होरक्याला जर संसदेत पाठवलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा एक चांगला संदेश जाईल.
आणि भाजपच "सोशल इंजिनिअरिंग" अधिकच बळकट होईल असे वाटते...


Post a Comment
0 Comments