डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे लोणी भापकर क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. ही स्पर्धा गुरुवार दि.12 मार्च पासून सुरू झाली असून रविवार दि.15 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत सामने खेळवले जात आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी गावातील मान्यवर व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा. सरपंच रवींद्र भापकर, माजी उपसरपंच तानाजी पवार, नंदकुमार मदने, माजी मुख्याध्यापक एस. एल. भापकर, सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी जगदाळे, अविनाश बनसोडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज मदने, दूध उद्योजक मनोज वाघ, हर्षुभैया भापकर, अमोल मदने, जयराज भापकर, नामदेव कुंभार, आशिष भापकर, वैभव भापकर, माऊली भापकर तसेच क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. 15 मार्च रोजी सायंकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन चिन्मय भापकर, सार्थक भापकर, अभिषेक भापकर, अथर्व जाधव, ऋषिकेश गोलांडे, ऋषिकेश भापकर, पृथ्वीराज गोलांडे, रोहन गोलांडे, स्वप्निल गावडे, तुषार बारवकर, सोहम गावडे, आदित्य भापकर, किरण खोमणे, तुषार गोलांडे, दिलीप धायगुडे, बाळासाहेब भापकर, वैभव लांभाते, अमोल मदने, पोपट होळकर व सोनू आरडे आदींनी केले आहे.



Post a Comment
0 Comments