डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा व तपपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
दि. २६ मार्च रोजी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर ६.३० ते ७.३० दरम्यान मूर्तीची आकर्षक फुलांनी व पूजन साहित्याने सजावट करण्यात आली.
यानंतर सकाळी ८.३० ते ९ या वेळेत मंदिर परिसरात सामुदायिक भजन व नामयज्ञ सोहळा पार पडला. पुढे १० ते १२ या वेळेत ह.भ.प. प्रमोद महाराज शिंदे (वडापुरी) यांचे श्रीराम जन्मावर आधारित कीर्तन झाले, ज्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
दुपारी १२ ते १२.३० दरम्यान महाआरती संपन्न झाली. त्यानंतर १२.४५ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने लोणी भापकर पंचक्रोशीतून भैरवनाथ मंदिर, विठ्ठल मंदिर, सोमाया मंदिर परिसरातून गजी नृत्य, ढोल-ताशा, झांजपथकांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्रीरामांची मूर्ती आणि रथसोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिमय झाले.
या उत्सवासाठी पुणे जिल्ह्यातील विविध भागातून भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सेवाभावातून व झोळी माध्यमातून सोहळा यशस्वीपणे पार पडला. भाविकांनी फुले अर्पण करून व झोळी भिक्षेद्वारे आपला सहभाग नोंदवला.
यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यंदा हे या सोहळ्याचे १२ वें वर्षे असल्याची माहिती सेवक बालयोगी पांडुरंग महाराज यांनी दिली.



Post a Comment
0 Comments