डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मगरवाडी हद्दीत असलेल्या नाईकवाडी येथे गेल्या दोन वर्षांपासून ट्रान्सफॉर्मर अभावी कमी दाबाने विज पुरवठा होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.
या समस्येची दखल घेत देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ 11 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर केला.
युवा नेतृत्व युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष राजेंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, युवक अध्यक्ष प्रदीप शेंडकर, युवती तालुकाध्यक्ष प्रियंका शेंडकर तसेच सरचिटणीस अंकिता मगर यांच्या प्रयत्नातून हा ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला.
पूर्वीच्या ट्रान्सफॉर्मरवर अधिक लोड असल्याने नाईकवाडी परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. मात्र नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कामासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे, लाईनमन दिगंबर सावंत, सागर भांडवलकर तसेच जागा उपलब्ध करून देणारे जगन्नाथ रिठे यांचे सहकार्य लाभले.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे दि. २६ मार्च रोजी या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन साध्यापणाने गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मगरवाडी-नाईकवाडी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments