Type Here to Get Search Results !

मुर्टी येथे शिखर शिंगणापूर पायी वारीचे जल्लोषात स्वागत; ग्रामस्थांकडून भाविकांची सेवा

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मुर्टी येथे शनिवार दिनांक २८ मार्च रोजी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर चैत्र पायी वारीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तेल्या भुत्याच्या प्रथम मानाच्या कावडीसह आलेल्या या पायी वारीचे मुर्टी व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत करत दर्शन घेतले.



या प्रसंगी पालखीसोबत आलेल्या भाविकांचे तसेच परिसरातील नागरिकांचे स्वागत संदेश जगताप, सागर जगताप व मंगेश जगताप परिवाराकडून करण्यात आले. कै. सुनंदा प्रकाश जगताप यांच्या स्मरणार्थ या परिवाराने भाविकांसाठी विशेष सेवा उपक्रम राबवला. सर्व भाविकांना थंड पाण्याच्या बाटल्या, लस्सी, ताक, सरबत, कोल्ड्रिंक्स तसेच अल्प उपहाराचे वाटप करण्यात आले. या सेवेमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.



वारीच्या निमित्ताने मुर्टी परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ठिकठिकाणी मिठाईची दुकाने, मुलांच्या खेळण्यांची दुकाने तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. संपूर्ण वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले होते.

Post a Comment

0 Comments