Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बारामती महिला शहराध्यक्षपदी उर्मिला म्हेत्रे यांची निवड

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी 

  सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कसबा, बारामती येथील उर्मिला बलभीम म्हेत्रे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बारामती महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बारामती शहरात साहित्य व सामाजिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दि. २९ मार्च २०२६ रोजी त्यांच्या कार्याची दखल घेत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हेत्रे या पुढील काळात परिषदेचे कामकाज अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी कार्यरत राहणार आहेत.

उर्मिला म्हेत्रे यांनी आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना सांगितले की, बारामती शहरातील महिलांचे विविध प्रश्न सोडविणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे आणि साहित्य परिषदेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविणे यावर त्यांचा भर राहणार आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत

Post a Comment

0 Comments