Type Here to Get Search Results !

धावडवाडीच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी; संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा वर्षाव



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

 काही दिवसांपूर्वी राज्यभर जिल्हा परिषद शाळांमध्ये घेण्यात आलेल्या ‘मंथन’ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धावडवाडी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु. सार्थक बापू सोनवणे याने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

 ‘मंथन’ परीक्षा ही इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. ही परीक्षा वरकरणी सोपी वाटत असली तरी तिचा अभ्यासक्रम आणि प्रश्नांची पातळी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची खरी कसोटी पाहणारी असते. त्यामुळेच या परीक्षेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 सार्थकच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गोविंद हाडके यांनी सांगितले की, "सार्थक हा अभ्यासात सातत्याने हुशार विद्यार्थी आहे. वर्गशिक्षिका रोहिणी धमाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने घेतलेली मेहनत आज फळाला आली आहे. त्याने शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे."

या उल्लेखनीय यशामुळे धावडवाडी गावासह संपूर्ण खंडाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून सार्थक व त्याच्या पालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments