डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुर्टी हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिरेखानवाडी येथील विद्यार्थ्याने मंथन परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेचा आणि परिसराचा मान उंचावला आहे.
या शाळेतील चिमुकला उपसरपंच किरण जगदाळे यांचा मुलगा स्वराज स्नेहा किरण जगदाळे याने नुकत्याच पार पडलेल्या मंथन परीक्षेत मुर्टी केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने राज्यात तेरावा तर जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळवला आहे.
त्याच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वराजच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव, शिक्षिका ज्योती शिंदे तसेच त्याची आई आणि चुलती रोहिणी जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि स्वराजच्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाले आहे.
स्वराजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुर्टी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments