डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील तरडोली येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील समाज मंदिरात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उपाध्यक्ष निखिल गाडे, पीआय सर्जेराव गाडे, ज्ञानदेव जाधव सर, भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र साळवे, माजी सरपंच सतीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आढावा घेत, त्यांच्या विचारांचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथातून डीजेच्या तालावर वाजत-गाजत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनात सिद्धार्थ युवक संघटना तरडोलीचे अध्यक्ष विकास साळवे, उपाध्यक्ष अजय साळवे, सचिव लहू साळवे, शेखर साळवे, गणेश खरात, प्रशांत साळवे, नागेश साळवे, माणिक चव्हाण, ऋत्विक चव्हाण, अर्जुन साळवे यांचा सक्रिय सहभाग होता.
तसेच गावातील युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



Post a Comment
0 Comments