Type Here to Get Search Results !

“जाणता राजा अजितदादा पवार” विषयावर तालुकास्तरीय वक्तृत्व व नृत्य स्पर्धेचे आयोजन

 


स्व. अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा

डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

 स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने तालुकास्तरीय वक्तृत्व व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “जाणता राजा अजितदादा पवार” हा वक्तृत्व स्पर्धेचा विषय असून, नृत्य स्पर्धेसाठी अजितदादांवरील गाण्यांवर आधारित समूह नृत्य ही थीम ठेवण्यात आली आहे.

ही स्पर्धा बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम मानला जात आहे.



स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹१०,००१, द्वितीय क्रमांकासाठी ₹५,००१, तृतीय क्रमांकासाठी ₹३,००१ तसेच उत्तेजनार्थ चौथ्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत प्रत्येकी ₹१,००१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.



 विशेष म्हणजे मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या गाव दौऱ्यादरम्यान या चिमुकल्यांनी आपली भाषणे मान्यवरांसमोर सादर केली होती. यावेळी उपस्थित असलेले युवा नेते जय पवार आणि रोहित पवार हे लहान मुलांच्या अभ्यासपूर्ण तयारीने व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने भारावून गेले होते. “इतक्या लहान वयात मुलांनी अजितदादांचे कार्य आणि संस्कार आत्मसात केलेले पाहून अत्यंत आनंद होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.

दि. २८ एप्रिल २०२६ रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी येथे सायंकाळी ६:०० वाजता पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवाकाका कारंडे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून, संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेणुका स्वप्नील कारंडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आयोजकांनी सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments